Sunday, September 21, 2014

Santu Nana - Ek chukela hishob

सन्तु नाना गेल्याची बातमी आली आणि मला थोडेसे गहिवरून आले.... तसे पाहिले तर सन्तु नाना आणि माझी काही अगदीच जवळीक होती असे नाही, परंतु माझ्या शालेय जीवणावर सन्तु नानाची खूप मोठी छाप होती…सन्तु नाना हे अगडबंबा  व्यक्तिमत्व आता या धरणीवर संचार करणार नाही याचे दुःख होण्यापेक्षा मला आश्चर्यच झाले होते… सन्तु नाना उर्फ संतोष नारायण नाडकर्णी ---  वयाच्या औघ्या १२ व्या वर्षी "शाळेत काही दम नाही " असे घोषित करून आमच्या तीर्थरूपांच्या "ब्लैक बूकात " सामिल होणारा पहिला इसम असा अचानक जावा याची मला  हळहळ  वाटावी हे नैसर्गिक नसून चमत्कारिक होते… 

आम्ही पचवीत पदार्पण केले तेव्हा सन्तु आमची गेल्या दोन तीन वर्षांपासून तिथेच वाट पाहत असल्याचे समजले …  वर्गात उंचापूऱ्या देहयष्टीचा  हाप चड्डीतला पहिलवान असल्याची जाणीव दर तासाला होत असे. आणि एखादा तास चुकलाच तर त्याची पुढील तासात भरपाई ठरलेली.  सन्तु  तसा वांड असला तरी आमच्या सारख्या "गरीब गाय, पोटात पाय" वारणातल्या मुलांना क्वचितच त्रास देत. त्याचा शत्रुपक्ष प्रामुख्याने शालेय जेलातील वार्डन आणि जेलर अर्थात शिक्षक आणि इतर कर्मचारी होते. काही हुशार आणि अगाऊ मुले मूली सुद्धा या गटात नोंदवली गेली होती. तात्पर्य काय तर सन्तु पासून लाम्ब रहावे हा सल्ला देणारे बहुसंख्य असून सुद्धा मी संतूच्या नादाला लागलो.

शाळेची वेळ झाली की झोकात  सायकल चालवणारा सन्तु जोरात शीळ मारतच अंगणात येत आणि मी मुकटयने डबल सीट शाळेत जात. "तू लई अभ्यास कर राव, साल्या पेडणेकराच्या थोबडावर आपन च्यालेन्ज दिलाय, इज्जत का सवाल हैं " असे सांगून मला प्रेरित करणारा सन्तु पहिलाच...  वाटेत इतर मुलांना मागे टाकणारा सन्तु आयुष्यात मागे राहिला याची कधी जाणीवच झाली नाही... उन्हाळ्यात सायकल शिकवणारा सन्तु आठवला की निस्वार्थ मैत्री काय असावी याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही… एकदा सन्तुने मला घरी बोलावले होते तेव्हा मला समजले की बाहेर इतर मुलांचा कर्दनकाळ असणारा सन्तु आतून अगदीच घबरलेला होता… अज्जी अजोबांसोबत राहणारा, घर साफ़ करणारा सन्तु मी तेव्हा एकदाच पहिला होता…

वर्षांमागुन वर्षे उलटली आणि सन्तु कसाबसा दहावीत पोहोचला .… त्या वर्षी  दोन विलक्षण ऐतिहासिक गोष्टी घडल्या ,एक म्हणजे बर्लिनची भींत पडली आणि दुसरीकडे सन्तु दहावी पास झाला… sendoff ला सन्तु गळ्यात पडून रडला तेव्हा अदृश्य असलेल्या नात्याची तुटणारी रेशिमगाठ मला दिसली नाही,

बऱ्याच वर्षांनी सन्तु पुन्हा रीयूनियनला  भेटला तेव्हा मी त्याला ओळखळच नाही , पाठीतून वाकलेला , वयागोदार म्हातारपण आलेला सन्तु आज अचानक केविलवाणा वाटला. बायकोच्या आजारपणत एस टी ची नौकरी टिकवून इमाने  काम करणारा सन्तु तो शालेय जीवनातील सन्तु नव्हताच जणू.....  गोखल्याने सांगितले तेव्हा कळले संतुने एका अंध मुलीशी लग्न केले होते ते , सन्तु अचानक मोठा झाला होता , आयुष्याच्या निकलपत्रावर सन्तु नानाने पहिला नंबर मिळवला होता पुढे त्याची बायको अजारपणात गेल्याचे समजले तेव्हा त्याला पत्र लिहिले होते। सन्तुने उत्तरात लिहिले होते "तू पुण्याला आलास की आपण सरदेसाई सरांकडे जाऊ , साला आयुष्याच्या गणितात आपला हिशोब चुकला रे.… आपण एकटाच नापास झालो"

to  be  continued …  

Monday, September 15, 2014

Ek Haravleli Sandhyakal

आज घरी येत असताना नजर अकास्मितपणे आकाशाकड़े गेली ....  अर्थातच बरेच दिवस झाले होते त्या  निळ्याशार अथांग  अस्तित्वाशी  नजरभेट होऊन, राहवेना म्हणून थोड़ा वेळ तसाच त्याच्या कड़े एकटक पाहत राहिलो, गाडी रस्त्याला उभी केली आणि आत मधे चालू असलेल्या सर्व संगीत वजा आवाज़ उत्पन्न  यंत्रणे बन्द केली अचनकच सर्व कही स्थिर असल्याची एक विचित्र जाणीव झाली .... मावळणारा सूर्य तसा मी अनेकदा पहिला आहे , अगदी आवर्जून आमच्या पुण्याच्या घरी गच्चीवरून तर अगणित वेळा .... पण त्या अनेक अगणित संध्याकाळी आजच्या कतरवेळी पेक्षा खूप वेगळ्या आहेत असे विनाकरण वाटून गेले  … आजची कातरवेळ लहानपणी डोक्यारून फिरवलेल्या आजीच्या हतासारखी मऊ आणि उबदार होती … पावसाळ्यात अंगणात येणाऱ्या गोगलगाई सारखी हळू होती … मनात थोड़ी हुरहुर जाणवलि आणि उगाचच मन उदास झाले … एव्हाना दिवे लागणीची वेळ झाली असावी कारण घराकडे धावणाऱ्या गाड्या गड़बड़ करत पुढे सरकत असल्याच्या भास् झाला … जणू पार्किंग मधे उभ्या असलेल्या इतर गाड्या आतुरतेने वाट पाहत असाव्यात असे वाटून गेले …

अशी एखादी संध्याकाळ येते आणि वाऱ्याने सुकलेल्या पिंपळ  पानाला भरकटून न्यावे तसे मनाला भूतकाळात घेऊन जाते … आजही संध्याकाळी उमलेल्या अंगणातला मोगरा आठवणीत ताजा आहे , पाऊस पडून गेल्या नंतर हाप चड्डीत धावणारे बालपण डोळ्यासमोर उभे राहिले की त्या AC पिंजऱ्यात बसणाऱ्या माझी मलाच कीव येते … पूर्वी दिवे लागले की मुकटयाने शुभं करोति म्हणणारा मी आता conference calls घ्यायला  विसरत नाही… आता पूर्वी सारखे संध्याकाळी आईच्या हातची मुगाची खिचड़ी मिळत नाही का उन्हाळ्यात भर दुपारी साप शिडी आणि चल्लस आठचे  डाव रंगत नाहीत …  आपण आयुष्यात विलक्षण अंतर पार पडल्याची अनुभूती होऊन गेली …

पुन्हा गाडीत बसलो तेव्हा speedometer वर पंचवीस हजार किलोमीटर पार पडल्याचा अकड़ा दिसला आणि माझे मलाच हसु आले। । खरच खूप अंतर पार पडले आहे। … आजी, आजोबा, बाबा हे इतके दूर राहिलेत की आता त्यांच्या आठवणी सुद्धा अंधुक झाल्यासारख्या वाटतात। … घरी आलो तेव्हा माझी छकुली आतुरतेने माझी वात पाहत होती तेव्हा लक्षात आले जग गोल का आहे ते…