सन्तु नाना गेल्याची बातमी आली आणि मला थोडेसे गहिवरून आले.... तसे पाहिले तर सन्तु नाना आणि माझी काही अगदीच जवळीक होती असे नाही, परंतु माझ्या शालेय जीवणावर सन्तु नानाची खूप मोठी छाप होती…सन्तु नाना हे अगडबंबा व्यक्तिमत्व आता या धरणीवर संचार करणार नाही याचे दुःख होण्यापेक्षा मला आश्चर्यच झाले होते… सन्तु नाना उर्फ संतोष नारायण नाडकर्णी --- वयाच्या औघ्या १२ व्या वर्षी "शाळेत काही दम नाही " असे घोषित करून आमच्या तीर्थरूपांच्या "ब्लैक बूकात " सामिल होणारा पहिला इसम असा अचानक जावा याची मला हळहळ वाटावी हे नैसर्गिक नसून चमत्कारिक होते…
आम्ही पचवीत पदार्पण केले तेव्हा सन्तु आमची गेल्या दोन तीन वर्षांपासून तिथेच वाट पाहत असल्याचे समजले … वर्गात उंचापूऱ्या देहयष्टीचा हाप चड्डीतला पहिलवान असल्याची जाणीव दर तासाला होत असे. आणि एखादा तास चुकलाच तर त्याची पुढील तासात भरपाई ठरलेली. सन्तु तसा वांड असला तरी आमच्या सारख्या "गरीब गाय, पोटात पाय" वारणातल्या मुलांना क्वचितच त्रास देत. त्याचा शत्रुपक्ष प्रामुख्याने शालेय जेलातील वार्डन आणि जेलर अर्थात शिक्षक आणि इतर कर्मचारी होते. काही हुशार आणि अगाऊ मुले मूली सुद्धा या गटात नोंदवली गेली होती. तात्पर्य काय तर सन्तु पासून लाम्ब रहावे हा सल्ला देणारे बहुसंख्य असून सुद्धा मी संतूच्या नादाला लागलो.
शाळेची वेळ झाली की झोकात सायकल चालवणारा सन्तु जोरात शीळ मारतच अंगणात येत आणि मी मुकटयने डबल सीट शाळेत जात. "तू लई अभ्यास कर राव, साल्या पेडणेकराच्या थोबडावर आपन च्यालेन्ज दिलाय, इज्जत का सवाल हैं " असे सांगून मला प्रेरित करणारा सन्तु पहिलाच... वाटेत इतर मुलांना मागे टाकणारा सन्तु आयुष्यात मागे राहिला याची कधी जाणीवच झाली नाही... उन्हाळ्यात सायकल शिकवणारा सन्तु आठवला की निस्वार्थ मैत्री काय असावी याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही… एकदा सन्तुने मला घरी बोलावले होते तेव्हा मला समजले की बाहेर इतर मुलांचा कर्दनकाळ असणारा सन्तु आतून अगदीच घबरलेला होता… अज्जी अजोबांसोबत राहणारा, घर साफ़ करणारा सन्तु मी तेव्हा एकदाच पहिला होता…
वर्षांमागुन वर्षे उलटली आणि सन्तु कसाबसा दहावीत पोहोचला .… त्या वर्षी दोन विलक्षण ऐतिहासिक गोष्टी घडल्या ,एक म्हणजे बर्लिनची भींत पडली आणि दुसरीकडे सन्तु दहावी पास झाला… sendoff ला सन्तु गळ्यात पडून रडला तेव्हा अदृश्य असलेल्या नात्याची तुटणारी रेशिमगाठ मला दिसली नाही,
बऱ्याच वर्षांनी सन्तु पुन्हा रीयूनियनला भेटला तेव्हा मी त्याला ओळखळच नाही , पाठीतून वाकलेला , वयागोदार म्हातारपण आलेला सन्तु आज अचानक केविलवाणा वाटला. बायकोच्या आजारपणत एस टी ची नौकरी टिकवून इमाने काम करणारा सन्तु तो शालेय जीवनातील सन्तु नव्हताच जणू..... गोखल्याने सांगितले तेव्हा कळले संतुने एका अंध मुलीशी लग्न केले होते ते , सन्तु अचानक मोठा झाला होता , आयुष्याच्या निकलपत्रावर सन्तु नानाने पहिला नंबर मिळवला होता पुढे त्याची बायको अजारपणात गेल्याचे समजले तेव्हा त्याला पत्र लिहिले होते। सन्तुने उत्तरात लिहिले होते "तू पुण्याला आलास की आपण सरदेसाई सरांकडे जाऊ , साला आयुष्याच्या गणितात आपला हिशोब चुकला रे.… आपण एकटाच नापास झालो"
to be continued …

No comments:
Post a Comment