आज घरी येत असताना नजर अकास्मितपणे आकाशाकड़े गेली .... अर्थातच बरेच दिवस झाले होते त्या निळ्याशार अथांग अस्तित्वाशी नजरभेट होऊन, राहवेना म्हणून थोड़ा वेळ तसाच त्याच्या कड़े एकटक पाहत राहिलो, गाडी रस्त्याला उभी केली आणि आत मधे चालू असलेल्या सर्व संगीत वजा आवाज़ उत्पन्न यंत्रणे बन्द केली अचनकच सर्व कही स्थिर असल्याची एक विचित्र जाणीव झाली .... मावळणारा सूर्य तसा मी अनेकदा पहिला आहे , अगदी आवर्जून आमच्या पुण्याच्या घरी गच्चीवरून तर अगणित वेळा .... पण त्या अनेक अगणित संध्याकाळी आजच्या कतरवेळी पेक्षा खूप वेगळ्या आहेत असे विनाकरण वाटून गेले … आजची कातरवेळ लहानपणी डोक्यारून फिरवलेल्या आजीच्या हतासारखी मऊ आणि उबदार होती … पावसाळ्यात अंगणात येणाऱ्या गोगलगाई सारखी हळू होती … मनात थोड़ी हुरहुर जाणवलि आणि उगाचच मन उदास झाले … एव्हाना दिवे लागणीची वेळ झाली असावी कारण घराकडे धावणाऱ्या गाड्या गड़बड़ करत पुढे सरकत असल्याच्या भास् झाला … जणू पार्किंग मधे उभ्या असलेल्या इतर गाड्या आतुरतेने वाट पाहत असाव्यात असे वाटून गेले …
अशी एखादी संध्याकाळ येते आणि वाऱ्याने सुकलेल्या पिंपळ पानाला भरकटून न्यावे तसे मनाला भूतकाळात घेऊन जाते … आजही संध्याकाळी उमलेल्या अंगणातला मोगरा आठवणीत ताजा आहे , पाऊस पडून गेल्या नंतर हाप चड्डीत धावणारे बालपण डोळ्यासमोर उभे राहिले की त्या AC पिंजऱ्यात बसणाऱ्या माझी मलाच कीव येते … पूर्वी दिवे लागले की मुकटयाने शुभं करोति म्हणणारा मी आता conference calls घ्यायला विसरत नाही… आता पूर्वी सारखे संध्याकाळी आईच्या हातची मुगाची खिचड़ी मिळत नाही का उन्हाळ्यात भर दुपारी साप शिडी आणि चल्लस आठचे डाव रंगत नाहीत … आपण आयुष्यात विलक्षण अंतर पार पडल्याची अनुभूती होऊन गेली …
पुन्हा गाडीत बसलो तेव्हा speedometer वर पंचवीस हजार किलोमीटर पार पडल्याचा अकड़ा दिसला आणि माझे मलाच हसु आले। । खरच खूप अंतर पार पडले आहे। … आजी, आजोबा, बाबा हे इतके दूर राहिलेत की आता त्यांच्या आठवणी सुद्धा अंधुक झाल्यासारख्या वाटतात। … घरी आलो तेव्हा माझी छकुली आतुरतेने माझी वात पाहत होती तेव्हा लक्षात आले जग गोल का आहे ते…

No comments:
Post a Comment